न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२०) :- केशवनगरमधील महापालिकेच्या शाळेत वास्तव्यास असणाऱ्या २६ व चिंचवड परिसरातील ५० नागरिकांना आज त्यांच्या मूळगावी जाण्याचा रस्ता मोकळा करण्यात आला. हे सर्वजण गुरुवारी दुपारी चिंचवड मधून पुण्याकडे बसद्वारे रवाना झाले.
लॉकडाऊन काळात येथील नागरिकांना अग्रेसर भवन मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भोजन व्यवस्था उपलब्ध केली होती. महापालिकेचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी, ब प्रभागाच्या क्षेत्रीय अधिकारी प्रभावती गाडेकर, कर्मचारी रसूल शेख, अजय गायकवाड, वाहन चालक हनुमंत शिंदे, विद्या कावडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) विश्वजीत खुळे यांच्या सह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गुरुवारी रात्री आठ वाजता पुणे स्टेशवरून रेल्वेने हे मध्यप्रदेश कडे रवानाही झाले आहेत .


















