न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे. २०२०) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आज सोमवारी एका पोलीस अधिका-याला करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. करोनाबाधित पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या देहूरोड येथील पोलीस कर्मचाऱ्यासह त्याचे अवघे कुटुंबच करोना पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.















