न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२०) :- कोरोनाच्या रुग्ण संख्येत देशात महाराष्ट्र क्रमांक १ वर पोहचला आहे. राज्य सरकारचा नाकर्तेपणा व सरकारच्या नेतृत्वाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळेच आज महाराष्ट्राची दुरावस्था झाली आहे.
या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन – अंगण हेच रणांगण’ या आंदोलनात येत्या शुक्रवार २२ मे रोजी सकाळी ११ वा. कार्यकर्त्यांनी राहत्या घरातील अंगणात आपले कुटुंब व मित्र मंडळीना बरोबर घेऊन आणि लोक प्रतिनिधी यांनी कार्यालया बाहेर फिजिकल डिस्टंस राखून कोरोनाबाबत राज्य सरकारच्या अपयशाचे फलक घेऊन काळे कपडे घालून, तोंडाला काळा मास्क लावून उभे राहून आंदोलन करावे, असे आवाहन आमदार तथा भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले आहे
’आंगण हेच रणांगण’ असे या निषेधाचे स्वरुप आहे. सर्व पदाधिकारी, व कार्यकर्ते यांनी या निषेध कार्यक्रमाच्या सहभागी होऊन सदर आंदोलनांचे फोटो पक्ष कार्यालय मंत्री संजय परळीकर यांना पाठविणे व सोशल मिडीयावरही जोरदार प्रसिद्धी करणे, असेही आमदार महेश लांडगे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे















