न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा गणपूर्तीअभावी १ जूनला दुपारी दीड वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. कोरोनाच्या संचारबंदीमुळे पालिकेच्या सलग २ सभा झालेल्या नाहीत.
तिसरी सभा घेण्याचे सत्ताधारी भाजपचे नियोजन होते. मात्र, संचारबंदी न हटल्याने सभागृहात नगरसेवक कसे उपस्थित राहणार हा प्रश्न निर्माण झाला होता. बुधवार (दि. २०) च्या सभेवर संचारबंदीचे सावट होते. सभेला केवळ ५ ते ६ नगरसेवक हजर होते. गणसंख्येअभावी महापौर उषा ढोरे यांनी सभा १ जूनपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय घेतला.