न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेस फाईव्ह स्टार रॅकिंग देण्यास केंद्र शासनाने स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे सन २०२० च्या सर्वेक्षणात शहराचे स्थान आणखी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
सर्वेक्षणानुसार केंद्र शासनाने कचरामुक्त शहरासाठी मानांकन सुरू केले होते. त्यात फाईव्ह स्टार, थ्री स्टार व वन स्टार अशी वर्गवारी करण्यात आली आहे. त्यामध्ये महापालिका व मेट्रो सिटींना कचरा प्रक्रिया, संकलन, वर्गीकरण १०० टक्के बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर नदी, नाले, तलाव यांच्या स्वच्छतेच्या उपाययोजनाचा समावेश आहे.
महापालिकेने पिंपरी चिंचवड शहर कचरामुक्त असून, फाईव्ह स्टार रॅकींगची घोषणा केली होती. सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन तो प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. मात्र, स्वच्छतेबाबतच्या निकषांमध्ये पालिकेला स्थान मिळालेले नाही. सदर प्रस्ताव केंद्राने फेटाळून लावला आहे.