- मोशी, पिंपळे गुरव, चिखली, इंदिरानगरमधील अकराजण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी दुपारच्या सत्रात बिजलीनगर व व चिखलीतील कुदळवाडी परिसरातील दोन महिलांना कोरोनाची लागण झालेली आहे. बिजलीनगर परिसरात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिजलीनगर परिसरातील महिलेचे वय ४५ वर्षे असून कुदळवाडीतील महिलेचे वय २७ वर्षे असे आहे.
तसेच आज मोशी, पिंपळे गुरव, चिखली, इंदिरानगरमधील अकरा कोरोनाबाधित व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान शहरातील सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५४ वर पोहोचली असून, महापालिकेच्या रुग्णालयात ७७ जणांवर उपचार सुरु आहेत. तर आजपर्यंत शहरातील १५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
बिजलीनगर परिसरातील सबंधित महिला कोरोना रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली आहे. मात्र, तिच्या घरचा पत्ता अचूक न मिळाल्यामुळे महापालिकेच्या बिजलीनगर येथील रुग्णालयातील डॉक्टरसह कर्मचारी संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे अजूनपर्यंत तरी ती महिला वास्तव्यास असणाऱ्या परिसरात महापालिकेचे आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचलेले नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


















