न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२०) :- देशभरात मागील चोवीस तासांत ६ हजार ६५४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असुन, १३७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २५ हजार १०१ वर पोहचली आहे.
देशभरातील तब्बल १ लाख २५ हजार १०१ करोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेल्या ६९ हजार ५९७ जणांचा व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या ३ हजार ७२० जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यता आलेली आहे. तर, टाळेबंदीमुळे करोनाच्या महासाथीचा प्रादुर्भावाचा वेग कमी करण्यात मोठे यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.


















