न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२०) :- सध्या महाराष्ट्रात लॉकडाउन आहे. ३१ तारखेपर्यंत हा लॉकडाउन आहे. त्यानंतर काय? असा प्रश्न सगळ्यांपुढे असेलच. लॉकडाउनचा प्रत्येकालाच कंटाळा आला आहे. मात्र एकदम लॉकडाउन करणं हे जसं चुकीचं आहे तसं तो एकदम उठवणंही चुकीचं आहे. हळूहळू सगळं सुरु करतो आहोत मात्र गर्दी झाली तर पुन्हा सगळं बंद करावं लागणार असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
दुकानं, उद्योगधंदे, व्यवसाय सगळं सुरु होईल. मात्र शिस्त पाळली गेली नाही तर सगळं बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.













