न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२०) :- पिंपरीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी (दि. 24) दुपारी भीषण अपघात झाला. तीनचाकी टेम्पो आणि कारच्या या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला.
पिंपरीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी दुपारी तीनचाकी टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातामध्ये टेम्पो बीआरटी मार्गाच्या दुभाजकावर आदळला असून कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावर आदळली आहे. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मयत आणि जखमींची नावे समजू शकली नाहीत. पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.













