न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर भाजपचे उपाध्यक्ष तथा युवा नेते दीपक मोढवे पाटील व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने आष्टी तालुक्यातील खुंटेफळ (वाटेफळ) गावात ‘एक हात मदतीचा’ माध्यमातून गावातील ग्रामस्थांना मोफत १० किलो साखरेचे वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे हातावरील पोटं असलेले गोरगरीब मेटाकुटीला आलेले आहेत. त्यामुळे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री सुरेश अण्णा धस यांच्या सूचनेनुसार मोढवे पाटील कुटुंबायांनी मदतीचा एक छोटासा प्रयत्न म्हणून, सोशल डिस्टंसिंग व मास्क परिधान करून, गावातील प्रत्येक घरास दहा किलो साखरेचे वाटप केले.
तसेच, काही दिवसांपूर्वी मोढवे पाटील कुटुंबीयांनी गावातील ग्रामस्थांना पाच किलो साखरेचे मोफत वाटप केले होते. साखरेचे दर सर्वसामान्यांना परवडत नाहीत. त्यामुळे मोढवे पाटील यांच्या मदतीमुळे ग्रामस्थ सुखावले आहेत.