न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे. २०२०) :- ताम्हाणेवस्ती येथील गणेश हौसिंग सोसायटीने कोरोना युध्दात सहभागी होत, परिसरात रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. छञपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन करून, रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. परिसरातील ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी तरूणाईने उस्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिवसेना शाखाप्रमुख प्रविण धोंडाप्पा पाटील, योगेश देशमाने, निरंजन गांधिले, विशाल जाधव, विकास काटे, आदिनाथ इंगळे, अक्षय सांळुखे, वैभव जाधव यांनी परिश्रम घेतले. डाॅ. डी. वाय. पाटील रक्तपेढी, पिंपरी यांचे तसेच पिल्ले व थोरात यांचे सहकार्य मिळाले.