न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोन उठविल्याने कारखाने, उद्योगधंद, खासगी कार्यालये आणि बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेकडून वितरीत केले जाणारे भोजन बंद करण्यात आले आहे.
लॉकडाऊनमुळे परप्रांतीय, कष्टकरी, मजूर, कामगार, गरजू, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचे अन्नाविना हाल होऊ नये म्हणून महापालिकेने कम्युनिटी किचन सुरू केले होते. स्वयंसेवी संस्था, संघटना तसेच नगरसेवकांमार्फत सुरु करण्यात आलेल्या ४१ कम्युनिटी किचनच्या माध्यमातून तब्बल १ लाख २६ हजार नागरिकांना दररोज भोजन दिले जात होते.
शहराचा नॉन रेडझोनमध्ये समावेश झाल्याने शहरातील व्यवहार सुरु झाले आहेत. अर्थचक्र हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. त्यातच मोठ्या संख्येने मजुर, कामगार आपल्या गावी निघून गेले आहेत. त्यामुळे बुधवार (दि. २०) पासून कम्युनिटी किचन बंद करण्यात आल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी सांगितले.