न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२०) :- पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून तीन जणांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. थेरगाव येथे मंगळवारी (दि. २६) रात्री ही घटना घडली. अतुल शामसुंदर यादव (वय २३, रा. थेरगाव) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी बुधवारी (दि. २७) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नन्या ऊर्फ सौरभ माळवदकर (रा. थेरगाव) आणि त्याचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी यादव हे घराजवळील मैदानात बसले होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून तिथे आले. ‘ तू बच्चा यादव सोबत का फिरतोस ‘, असे म्हणत पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून हत्याराने फिर्यादी यांच्यावर वार केले. अन्य दोन आरोपींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.