न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२०) :- चिंचवड स्टेशन येथील साईबाबानगर येथे गुरुवारी (दि. २८) रोजी रात्री आरोपी एका व्यक्तीस त्रास देत असल्याने त्या व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. पोलीस घटनास्थळी गेले असता आरोपींनी आपसांत संगनमत करून जमावबंदी असतानाही बेकायदा जमाव जमवून आरडा-ओरडा केला. तसेच पोलिसांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणला.
पोलीस कर्मचारी दीपक गोरोब टेंकाळे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच, हरीश प्रकाश शेलार, सतीश विजय जाधव, विजय गौतम शेलार, रेश्मा विजय जाधव, सीता गणेश कसबे सर्व रा. साईबाबा नगर, चिंचवड स्टेशन व इतर पाचजण (नाव माहिती नाही) अशा १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.