- साई चौकातील काळेवाडी-औंध उड्डाणपुलाचे अजितदादांच्या हस्ते उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने उभारलेल्या साई चौकातील काळेवाडी-औंध उड्डाणपुलचे शुक्रवारी (दि. २९) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
अजित पवार म्हणाले की, लॉकडाउनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून नोकऱ्या, व्यवसाय, व्यवहार बंद आहेत. सगळे कामकाज ठप्प आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने जाहिर केलेल्या पॅकेजमध्ये केवळ मोठ-मोठे आकडे पहायला मिळाले आहेत. प्रत्यक्षात विविध राज्यातील जनतेच्या हातामध्ये किती पैसा जाणार, असा सवाल उपस्थित होत आहे. राज्यात सर्वांवर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यातून मार्ग काढायचा आहे. यासाठी राज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेजची घोषणा करणार आहे. मंत्रीमंडळात त्याबाबतचा निर्णय होईल.
यावेळी आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक राजू मिसाळ, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे, ज्ञानेश्वर कस्पटे व आदी उपस्थित होते.