न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे. २०२०) :- पिंपळे निलख येथे नऊ जणांच्या टोळक्याने एका केबलचालकासह त्याच्या मित्राल विनाकारण मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. २८) दुपारी एकच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली.
आकाश भागवत शेळके (वय २६, रा. राजीव गांधीनगर पर्वती पायथा, पुणे), अनंत कोळी, भूषण कांबळे, पिल्ले व त्याचे पाच साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरण शशिकांत किसन पोशेरे (२९, रा. गणेशनगर, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी शशिकांत आणि त्यांचा मित्र यांना मारहाण केली. तसेच डोक्यात दगड मारला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.