न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून. २०२०) :- अॅमेझॉन या ऑनलाइन कंपनीकडून एका इसमाने लॅपटॉप मागविला परंतु लॅपटॉपऐवजी त्यांची ३७,९९० रुपयांची फसवूणक करण्यात आली. ही घटना तळवडे येथे गुरुवारी (दि. ४) रोजी घडली.
या प्रकरणी चिन्मय गिरीष मघोळकर (वय ३६, रा. देवी इंद्रायणी सोसायटी, तळवडे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी यांनी अॅमेझॉन या ऑनलाइन कंपनीकडून एक लॅपटॉप मागविला होता. ऑर्डर करताना फिर्यादी यांनी क्रेडिट कार्डवरुन ३७,९९० रुपयांचे ऑनलाइन पेमेंटही केले होते.
गुरुवारी सकाळी डिलिव्हरी बॉय लॅपटॉपचे पार्सल देऊन निघून गेला. त्यानंतर पार्सल उघडून पाहिले असता त्यात लॅपटॉपऐवजी फरशी निघाली. याबाबत कंपनीकडे तक्रार केली. परंतु त्यांनी हात झटकले आहेत.














