न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. जून. २०२०) :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव हे निवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर सध्या तात्पुरत्या स्वरूपात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अधिक्षक अभियंता प्रभाकर वसईकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
यादव हे ३१ मे रोजी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर वसईकर यांची नेमणूक केली आहे. शासनाकडून नवीन अधिकारी नियुक्त होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडेच हा पदभार राहणार आहे.