- शहरातील १५ ठिकाणच्या २८ जणांना आज कोरोनापासून मुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. जून. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शुक्रवारी हाती आलेल्या अहवालानुसार ९३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. यात ५३ पुरुष व ४० महिलांचा समावेश आहे. आज पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील औंधमधील आबेडकर वसाहत व जुन्नर येथील तीन पुरुष व दोन महिलांना कोरोनाची लागण झालेली आहे.
दरम्यान शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १११० वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ५२६ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या २२ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज बाधित झालेले रुग्ण जुनी सांगवी, अजंठानगर, संत तुकारामनगर भोसरी, बेलठिकानगर थेरगांव, गुलाबनगर दापोडी, साईबाबानगर चिंचवड, नाणेकर चाळ पिंपरी, पवारवस्ती दापोडी, श्रीदत्त कॉलनी थेरगाव, काळेवाडी, संजय गांधीनगर पिंपरी, नेहरूनगर, त्रिवेणीनगर, यमुनानगर, भीमनगर पिंपरी, दत्तनगर दिघी, जयभीमनगर दापोडी, आनंदनगर, सिद्धार्थनगर दापोडी, वैष्णोदेवी मंदिर पिंपरी, चिखली, रमाबाई नगर, बौद्धनगर पिंपरी, जाधववाडी चिखली, मिलिंदनगर पिंपरी, अंकुश चौक निगडी, शिवतीर्थनगर काळेवाडी, पोलीस कॉलनी वाकड, जयमालानगर सांगवी आणि सुदर्शननगर पिंपळे गुरव येथील रहिवासी आहेत.
आज आनंदनगर, नेहरुनगर, साईनाथनगर निगडी, महात्मा फुलेनगर वाय.सी.एम., नानेकर चाळ पिंपरी, मोरवाडी, पिंपळे गुरव, दत्तनगर वाकड, दापोडी, सद्गुरु कॉलनी वाकड, नेहरुनगर, रुपीनगर, पवारवस्ती दापोडी, रमाबाईनगर पिंपरी, थरमॅक्स चौक येथील २८ कोविड बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.