न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेने करोना महामारीच्या संकट काळात शहरातील अनधिकृत हातगाड्या विक्रेत्यांवर कारवाई तीव्र केली आहे. तब्बल ४ हजार हातागाड्या जप्त केल्या गेल्या. त्यांच्यावरील दंडातून पालिकेस २५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला. त्यामुळे रस्त्यावर फिरून हातगाड्यावर भाजी व फळ विक्रीस महापालिकेने बंदी घातली होती. मात्र, त्यानंतरही अनेक विक्रेते रस्तोरस्ते आणि गल्लोगली फिरून भाजी व फळ विक्री करीत होते.
अशा अनधिकृत विक्रेत्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. एप्रिल व मे या दोन महिन्यात पथकाने तब्बल ४ हजार हातगाड्या जप्त केल्या आहेत. त्यांच्याकडून वसूल केलेल्या दंडातून २५ लाख रूपये जमा झाले आहेत.