- दापोडीतील सिध्दार्थनगर येथील वृद्ध महिलेचा मृत्यू…
- शहरातील ५७ कोविडबाधितांना रुग्णालयातून सोडले घरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. १६) रोजी ८४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. यात ४८ पुरुष व ३६ महिलांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील येरवडा, खड़की, कोंढवा, जळगांव येथील पाच पुरुष आणि तीन महिलांना कोरोनाची लागण झालेली आहे. तसेच आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील दापोडीतील सिध्दार्थनगर येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेचा आणि पिं. चिं. हद्दीबाहेरील लोणावळा येथील ५७ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
दरम्यान शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १३३० वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ४९९ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आलेले रुग्ण रमाबाईनगर पिंपरी, ताम्हाणेवस्ती निगडी, तापकिरनगर मोशी, प्रियदर्शनीनगर सांगवी, निगडी, खराळवाडी, बौध्दनगर पिंपरी, नवभारतनगर दापोडी, अजंठानगर आकुर्डी, पीसीएमसी बिल्डिंग निगडी, तापकिर चौक काळेवाडी, महात्मा फुलेनगर दापोडी, मोरवाडी रोड चिंचवड, नेहरुनगर, मोरेवस्ती चिखली, धावडेवस्ती भोसरी, नढेनगर काळेवाडी, सिध्दार्थनगर दापोडी, अजिंक्यनगर काळेवाडी, नवलेवस्ती चिखली, साईबाबानगर चिंचवड, नागेश्वरनगर मोशी, नानेकरचाळ पिपरी, चक्रपाणी वसाहत भोसरी, चिंचवडगांव, जाधव चौक दापोडी, बौध्दनगर, डि.वाय.पाटील हॉस्टेल, जयभीमनगर दापोडी, पंचतारानगर आकुर्डी येथील रहिवासी आहेत.
आज दत्तनगर थेरगांव, आनंदनगर चिंचवड, बौध्दनगर, सिध्दार्थनगर दापोडी, गुलाबनगर दापोडी, साईबाबानगर चिंचवड, अशोकनगर पिंपरी, सद्गुरु कॉलनी वाकड, अजंठानगर आकुर्डी, भाटनगर, खंडोबामाळ भोसरी, काळेवाडी, महात्मा फुलेनगर भोसरी, जुनी सांगवी, नानेकरचाळ पिंपरी, रमाबाईनगर पिंपरी येथील ५७ कोविडबाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत शहरातील एकूण ७९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.