न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै. २०२०) :- पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) मुंबई शहराचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बन्सी गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांनी आज (बुधवारी) पदभार स्वीकारला आहे. प्राधिकरणाच्या कारभाराचा व्यवस्थित अभ्यास करून नियोजनबद्ध विकास करणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.