न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जुलै. २०२०) :- करोना संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी सर्व प्रकारची दस्त नोंदणी ऑनलाईन घरबसल्या सुरू करावी, अशी मागणी अॅड. बाळासाहेब थोपटे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नोंदणी महानिरीक्षकांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या करोना हा आजार मोठ्या प्रमाणात देशात पसरला आहे. करोना हा संसर्गजन्य आजार आहे. दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना कार्यालयात दोन ते तीन तास विनाकारण थांबावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाया जाते.
तसेच दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये एखादा नागरिक करोनाबाधित असेल तर मोठ्या प्रमाणावर फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दस्त नोंदणी कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी दस्त नोंदणी घरूनच ऑनलाईन चालू करण्यात यावी, असे या निवेदनात अॅड. थोपटे यांनी म्हटले आहे.