न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पिंपरी चिंचवडमध्ये रविवार आणि गुरुवार या दोन दिवशी जनता कर्फ्यु लावण्याचे आदेश महापौर यांनी दिले आहेत.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यु आवश्यक असून पिंपरी चिंचवडकरांनी याची दखल घेऊन विनाकारण घराबाहेर न पडता जनता कर्फ्युला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापौर ढोरे आणि पक्षनेते नामदेव ढाके यांनी नागरिकांना केले आहे.