- परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर असणार पोलिसांचा वॉच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. जुलै. २०२०) :- पिंपरी चिचवड शहरातील कोविड १९ चा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी व संभाव्य सामुदायीक प्रसार टाळण्यासाठी शहरातील नागरिकांच्या हालचालीवर, बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण्याकरीता महापालिका आयुक्तांनी प्रभाग १४, प्रभाग १९, प्रभाग १० मधील परिसर हा Cluster Containment Zone म्हणून तसेच सर्वेक्षणाकामी कटेनमेंट झोनच्या भोवतालचा परिसर हा Buffer zone म्हणून घोषित केला आहे.
त्यानुसार या क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान व वाहनांचे आवागमन प्रतिबंधित करण्यात येणार आहे, याबाबतच्या आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी आज मंगळवार, दि. ०७ जुलै २०२० रोजी रात्री ११.०० वाजलेपासून होणार आहे.
क्लस्टर कटेनमेंट झोन व बफर झोन (Buffer zone) मधील परिसर पुढीलप्रमाणे…
१) म्हाडा कॉलनी, मोरवाडी Cluster Containment Zone Buffer Zone (अविनाश स्टेशनरी – मोरवाडी कॉलनी रोड- PHYSC जिम – जनसेवा सहकारी बैंक)
२) प्रेस्टीज क्लासिक (B), चिंचवड स्टेशन Cluster Containment Zone Buffer Zone (चिंचवड स्टेशन – चिंचवड चौक – टीजेएसबी सहकारी बैंक – चिंचवड जंक्शन)
३) काकडे रेसिडेन्सी, चिंचवड स्टेशन Cluster Containment Zone Buffer Zone (छ. शिवाजी महाराज चौक – हायवे टॉवर – प्रतिभा कॉलेज- ESIC हॉस्पीटल)
४ ) अनिकेत पार्क, शाहुनगर, चिंचवड Cluster Containment Zone Buffer Zone (गौरी गट – मधुसुदन हौसिंग सोसायटी – अभिषेक आर्टस कॉमर्स ऍण्ड सायन्स)
५ ) मेट्रोपोलिय्यम सो. B – Wing चिंचवड Cluster Containment Zone Buffer Zone (सारस्वत बँक – मेट्रोपोलिय्य्म सो.मेन गेट – जुने ब प्रभाग – बैंक ऑफ बडोदा)
६) बिल्डींग नं. १५, भाटनगर, पिंपरी Cluster Containment Zone Buffer Zane (रिव्हर रोड – एसवायपी प्लॅन्ट – नाला – पवना रिव्हर – रिव्हर रोड – रिव्हर रोड )
७) प्रियदर्शनी अपार्टमेंट, चिंचवड Cluster Containment Zone Buffer Zone (सहयाद्री नागरी सहकारी पतसंस्था – हॉटेल जीवन – सुखवानी व्हिला सो – मोनिका हो. सोसायटी – सुदर्शन हेला केअर)
८) विदया विहार, संभाजीनगर, चिंचवड Cluster Containment Zone Buffer Zone (राजहंस सोसायटी – रबागिरी हाँसिंग सोसायटी – साई उदयान कॉर्नर – संभाजीनगर बस स्टॉप )
९) निरुपम हौसिंग सोसायटी २, आकुर्डी Cluster Containment Zone Buffer Zone ( सलोनी अपार्टमेंट – सेंट ऊर्सला स्कुल – उत्कर्ष क्लासेस)
१०) सुरभी सोसायटी, चिंचवड Cluster Containment Zone Buffer Zone (रत्नागिरी हौसिंग सोसायटी – संभाजीनगर बसस्टॉप – साई उदयान कॉर्नर – राजहंस सोसा)
११ ) एकता हौसिंग सोसायटी, संभाजीगनर, चिंचवड Cluster Containment Zone Buffer Zone ( रत्नागिरी हौसिंग सोसायटी – संभाजीनगर बसस्टॉप – साई उदयान कॉर्नर – राजहंस सोसा)
१२) एम्पायर ईस्टेट, चिंचवड Cluster Containment Zone Buffer Zone ( रांका ज्वेलर्स – जय हिंद कलेक्शन – दर्शन ऍकडमी स्कुल – प्रिमियर ऍटो)
उपरोक्त सीमाभागामधील कंटेनमेंट झोन येथील सर्व संबंधित पोलिस ठाण्याच्या अंकित असलेला कंटेनमेंट परिसर (१ ते १२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे) आज मंगळवार, दि. ०७ जुलै २०२० रोजी रात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सदर परिसर संबंधित पोलिस स्टेशन प्रमुख यांच्यामार्फत सील करण्यात येणार आहे. तसेच कंटेनमेंट परिसरांच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकाना बंदी आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी व वाहने तसेच शासकीय व सेवा देण्यात येणाऱ्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे.












