- पिंपरी, चिंचवड, चिखलीतील पाच जणांचा कोरोनाने घेतला जीव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. ०७ जुलै) रोजी ३४२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज पिंपरी चिंचवड शहरामधील (पुरूष वय ६४) बौद्धनगर, पिंपरी, (पुरूष वय ८५) शरदनगर, चिखली, (पुरूष वय ८४) चिंचवड, (पुरूष वय ६७) सुखवाणी, पिंपरी, (स्त्री वय ७५) मिलिंदनगर, पिंपरी येथील पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ५२०३ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात १९६८ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या १३ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३१३८ वर पोहोचली आहे. आज पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.












