न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. जुलै. २०२०) :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल उद्या (बुधवार) जाहीर करण्यात येणार आहे. केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी यासंबंधी घोषणा केली. सोमवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता.
उद्या cbse.nic.in , cbseresults.nic.in आणि results.nic.in या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहायला मिळणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावीचे तब्बल १८ लाख विद्यार्थ्यी निकालाच्या प्रतीक्षेत होते. मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरद्वारे सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या निकालाच्या तारखेची माहिती दिली.
दिल्लीतील सीबीएसई विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल इंटरनल असेसमेंट, प्रोजेक्चट वर्क आणि असाईनमेंट्सच्या आधारावर जाहीर केले जाणार आहेत.


















