न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. जुलै. २०२०) :- करोना व्हायरसला रोखू शकणारी लस विकसित करण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने बनवलेली लस मानवी परीक्षणामध्ये यशस्वी ठरली असली तरीही लस लगेच बाजारात उपलब्ध होणार नाही.
रविवारी प्रसिद्ध झालेल्या वेगवेळया वृत्तांमध्ये रशियाने करोनावर विकसित केलेल्या लसीच्या क्लिनिकल चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे म्हटले होते. ती लस बनवणाऱ्या सेचेनोव्ह विद्यापीठानेच तसा दावा केला होता.
रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने बनवलेली लस मानवी परीक्षणामध्ये यशस्वी ठरली असली तरी, ही लस लगेच बाजारात उपलब्ध होणार नाही. लसीची क्लिनिकल चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली असली तरी, ती फेज वनची चाचणी होती. ही माहिती बहुतांश बातम्यांमध्ये देण्यात आली नव्हती. या लसीच्या फेज २ च्या चाचण्या सोमवारपासून सुरु झाल्या आहेत. फेज ३ बद्दल काहीही स्पष्टता नाहीय.


















