न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. जुलै. २०२०) :- प्रस्तावित हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान होणाऱ्या मेट्रोच्या कामात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील पूल अडचणीचा ठरला आहे. त्यामुळे सर्व तयारीनंतर हा पूल पाडण्यास आजपासून (दि.१४) सुरुवात झाली आहे.
त्याचबरोबर पीएमआरडीएमार्फत उभारण्यात येणाऱ्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या कामालाही सुरुवात होणार आहे. मात्र, त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील महापालिकेने बांधलेले दोन उड्डाणपूल मेट्रोच्या कामात अडचणीचे ठरले आहेत. त्यामुळे महापालिका आणि राज्य सरकाराच्या परवानगीनंतर आजपासून हे पूल पाडण्यास सुरुवात झाली आहे.


















