न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. जुलै. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरातील टाळेबंदी १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली असून २३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत ती कायम राहणार आहे. करोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून राज्यशासनाने २३ जुलैपर्यंत ही टाळेबंदी लागू केली आहे.
त्यातील पहिले पाच दिवस कडक अंमलबजावणी होणार असल्याचे पालिका तसेच पोलीस आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, टाळेबंदीच्या पूर्वसंध्येलाच पिंपरी पोलीस आयुक्तालय कामाला लागले होते. पोलिसांनी ठिकठिकाणी संचलन करत टाळेबंदीचे नियम पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी स्वतंत्र आदेशाद्वारे दिला आहे.


















