- आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित नगरसेवक अॅड. नितीन लांडगे यांचे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन.
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (२२ नोव्हें) :- भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, पिंपरी चिंचवड हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने ‘आमदार श्री २०१८ चषक’ या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे सोमवार (दि. २६ नोव्हें) रोजी भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा लांडगे लिंबाची तालीम मंडळ व भोसरी कला क्रीडा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे. स्पर्धेत सहभागी संघाना आकर्षक बक्षीसे व चषक स्मृतीचिन्ह स्वरूप असणार आहे. अनुक्रमे ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८० व त्यापुढील वजनी गटामध्ये सामने होणार असून, प्रत्येक वजनी गटामध्ये भरपूर रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी स्पर्धकांनी नगरसेवक नितीन लांडगे यांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे स्पर्धेचे मुख्य संयोजक नगरसेवक अॅड. नितीन लांडगे यानी संगीतले आहे. यावेळी शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव राजेश सावंत, अमित डोळस, विजय लांडगे, संतोष लांडगे, अशोक बिचकुले, विनय लांडगे, दीपक लांडगे, सुनील लांडगे, प्रकाश लांडगे आदी उपस्थित होते.