- स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांचा स्तुत्य उपक्रम.
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (२२ नोव्हें) :- स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांच्या माध्यमातून चिखलीतील विकास अनाथ आश्रम येथे आज गुरुवार (दि.२२) रोजी अन्नदान वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निमित्त होते आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे.
यावेळी विकास अनाथ आश्रमाचे संस्थापक विकास साने, रामकृष्ण लांडगे, माऊली हराळ, राजेश डोंगरे, पंडित तिवारी, सोनू अन्सारी, चद्रकांत जाधव, वैभव वाघ, दिपक घन, किशोर लोंढे आदी उपस्थित होते.
















