न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जुलै. २०२०) :- करोनाबाधित बहुतांश रुग्णांमध्ये काही लक्षणे आढळत नाहीत. पिंपरी चिंचवड महापालिकेने अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड केअर सेंटर उभारले आहेत. बालेवाडी येथे उभारण्यात आलेल्या सेंटरमध्ये आतापर्यंत १८०० रुग्णांवर यशस्वी उपचार केले.
पिंपरी चिंचवड शहरात करोनाबाधित रुणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण शहरात करोनाचा फैलाव झाला असून शहरातील प्रत्येक भागातील रुग्ण उपचाराधीन आहेत. उपाचाराधीन असलेल्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांमध्ये काहीच लक्षणे नाहीत. फक्त त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
महापालिकेने लक्षणे नसलेलेल्या रुग्णांसाठी बालेवाडी क्रीडा संकुल येथे ३०० बेडचा क्वॉरंटाझ वॉर्ड तयार केला आहे. ११ मे पासून हे सेंटर सुरु करण्यात आले आहे. डॉ. विनायक पाटील यांच्याकडे सेंटरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


















