न्युज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. १८ नोव्हें.) :- रहाटणीतील तापकिरनगर येथील हॉटेल राजरत्न परिसरात बऱ्याच दिवसांपासून ड्रेनेजलाईन नादुरुस्त झाली होती. या घटनेची दखल घेत न्यूज पीसीएमसीने ”तापकीरनगर परिसरातील ड्रेनेज लाईन तात्काळ दुरुस्त करा” या मथळ्याखाली ड्रेनेजलाईन दुरुस्ती संदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत ‘ग प्रभाग’ प्रशासनाने ताबडतोब ड्रेनेजलाईन दुरुस्तीसाठी पाऊले उचलली आहेत.
रहाटणी शिवसेना व न्यूज पीसीएमसीच्या माध्यमातून हे काम मार्गी लागले असून, परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
















