न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. जुलै. २०२०) :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, लॉकडाऊनच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी (दि. १५) रोजी जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ५५८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
यात भोसरी एमआयडीसी ( ७६ ), भोसरी ( १९ ), पिंपरी ( ४० ), चिंचवड ( १६ ), निगडी ( २८ ), आळंदी ( ६ ), चाकण ( २० ), दिघी ( २२ ), म्हाळुगे चौकी ( ३१ ), सांगवी ( ३४ ), वाकड ( २५ ), हिंजवडी ( ३२ ), देहूरोड ( ६९ ), तळेगाव दाभाडे ( २७ ), तळेगाव एमआयडीसी ( २९ ), चिखली (७१), रावेत चौकी ( ४ ), शिरगाव चौकी ( १८ ) अशा एकूण ५५८ जणांवर कारवाई आहे. त्यामुळे लॉकडाऊनची कोणतीच भीती नागरिकांना नसल्याचा प्रकार समोर आला आहे.