न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. जुलै. २०२०) :- निगडी येथील अन्न व पुरवठा विभागाचे परिमंडळ कार्यालय गुरुवारपासून (दि. १६) पुढील आठ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्या संपर्कातील सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
त्यामुळे येथून पुढे आठ दिवस विभागातंर्गत सर्व कामकाज बंद राहणार असल्याचे नायब तहसीलदार तथा परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे गेल्या आठवडाभरात या कार्यालयात विविध कामासाठी आलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे व आवश्यक वाटल्यास तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दररोज दोनशे ते अडीचशे नागरिक विविध कामासाठी या कार्यालयात येत असत.


















