न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. जुलै. २०२०) :- करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मे व जून महिन्यात केशरी रेशनकार्ड धारकांना सवलतीच्या दरात तांदळाचे वाटप करण्यात आले. आता जुलै व ऑगस्ट महिन्यातही हे धान्य वाटप केले जाणार आहे. जुलै महिन्यातील धान्य वाटपासाठी रास्त भाव धान्य दुकानदारांकडे आठवडाभरात धान्य पोहचविण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या प्रत्यक्ष वाटपाला सुरवात होईल.
जुलै महिन्यात आणि ऑगस्टमध्ये केशरी रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य मिळणार आहे. शहरात एकूण २५५ धान्य दुकाने आहेत. त्यांच्या माध्यमातून हे धान्य वितरित केले जाणार आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत अन्नसुरक्षा आणि अंत्योदय धान्य योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल ते जून अशा तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मोफत धान्य वाटप करण्यात आले. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. ४५३ मेट्रिक टन गहू आणि ३०२ मेट्रिक टन तांदूळ असा धान्यसाठा मंजूर झाला आहे. पुढील आठवड्यापासून वाटप करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी दिली.















