आज ५९२ जणांना कोरोनाची बाधा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज रविवारी (दि. १९ जुलै) रोजी ५९२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. आज पिंपरी चिंचवड हद्दीतील १२ व हद्दीबाहेरील ०५ अशा १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात दिघी (पुरुष, ६२ वर्षे), चिखली (पुरुष, ६३ वर्षे, पुरुष, ६४ वर्षे) निगडी (पुरुष २१ वर्षे, पुरुष ४५ वर्षे), पिंपळेगुरव (स्त्री ५४ वर्षे, पुरुष ५५ वर्षे), चिंचवड (स्त्री ५९ वर्षे), भोसरी (स्त्री, ५४ वर्षे), पिंपरी (पुरुष, ६३ वर्षे), कासारवाडी (पुरुष ५७ वर्षे), रुपीनगर (पुरुष, ५२ वर्षे), चाकण (स्त्री, ६० वर्षे), दौंड (पुरुष, ४३ वर्षे), तळेगांव दाभाडे (पुरुष, ५२ वर्षे), खडकी (पुरुष, ५२ वर्षे), शिरपुर (पुरुष, ५७ वर्षे) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ११०३८ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ३१६५ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या ४० वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण १९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६६९९ वर पोहोचली आहे. आज पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.













