न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. जुलै. २०२०) :- पिंपरीगावातील कलापुरे कुटुंबातील एकाच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन सख्या भावांचा करोनामुळे अवघ्या नऊ दिवसांत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
करोनामुळे एकाच घरातील तिघांचा आणि तोही सख्या भावंडाचा बळी जाण्याची ही शहरातील पहिलीच घटना आहे. याशिवाय कोरोनामुळे इंद्रायणीनगर ग्लोरीयस पार्क सोसायटीमधील एका दापंत्याचा देखील मृत्यु झालेला आहे. त्यामुळे शहरात चिंताजनक वातावरण पसरले आहे.













