न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. जुलै. २०२०) :- पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. १६) दुपारी चारच्या सुमारास शिवाजीवाडी, मोशी येथे घडली.
सविता जालिंदर बोराटे (४५, रा. शिवाजीवाडी, मोशी) असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी महिलेचा भाऊ संजय मल्हारी भुजबळ (४६, रा. दराके वस्ती, तळेगाव ढमढेरे, शिरूर) यांनी शनिवारी (दि. १८) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती जालिंदर नारायण बोराटे (वय ६०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिसनिरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जालिंदर याने पत्नी सविता यांचा घरगुती कारणावरून शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच, तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन ये, तुझ्या आई – वडिलांच्या जमिनीत आपला हिस्सा लाव, असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केली. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून सविता यांनी गुरुवारी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सविता यांच्यावर एका खासगी ग्णालयात उपचार सुरू होते.













