न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व पिंपरी चिंचवडचा कडवा दलित पँथर लक्षण (तात्या) शामराव गायकवाड यांचे आज पहाटे ४ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचा अंतविधी सकाळी ११.०० वाजता चिंचवड लिक रोड येथील स्मशान स्मशानभूमीत पार पडला. त्यांच्या मागे दोन पत्नी, दोन मुले व दोन मुली विवाहित व एक अविवाहित मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते मूळचे बनसारोळा, ता. केज, जि. बीड येथील रहिवासी आहेत.













