मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष्य अशोक चव्हाण यांनी ‘राज्यातल्या जनतेचा एकच निर्धार, महाराष्ट्राला बदलायचय हे नाकर्ते सरकार’ या घोषणेने २०१९ च्या राजकीय लढाईला सुरवात केली आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, “केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता, पण प्रगतीशील महाराष्ट्र बनलाय एक मागासलेलं अस्वस्थ राज्य. नियोजनशून्य धोरणांमुळे उद्योजक, शेतकरी, सामान्य नागरिक हवालदील झालेत. बेरोजगारी- गुन्हेगारीही वाढली. आता राज्यातल्या जनतेचा एकच निर्धार, महाराष्ट्राला बदलायचय हे नाकर्ते सरकार.” हे घोषवाक्य आता काँग्रेसचे अस्त्र असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे घोषवाक्य ‘राज्यातल्या जनतेचा एकच निर्धार, महाराष्ट्राला बदलायचय हे नाकर्ते सरकार’

















