जैवइंधनावर विमानाचे उड्डाण करण्यात भारताला यश मिळाले आहे. यामुळे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाबरोबरच जैवइंधनावर विमान उडवणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. रविवारी देहरादूनमध्ये पहिल्यांदाच स्पाईसजेटच्या Bombardier Q400 विमानाने जैवइंधनावर उड्डाण केले. हे जैवइंधन भाज्यांपासून तयार करण्यात आलेले तेल, साखर, प्राण्यांची चरबी आणि बायोगॅसपासून तयार करण्यात आले होते. या विमानाचे उड्डाण सोमवारी सकाळी होणार होते. मात्र, एकदिवस आधी रविवारी सकाळी ६.३१ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केले आणि ६.५३ मिनिटांनी ते विमानतळावर परतले, अशी माहिती स्पाईसजेटच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुरुवातीला विमान देहरादून येथून दिल्लीला नेण्याची योजना होती, पण नंतर ती बदलण्यात आली. दरम्यान, या आधी अमेरिका व ऑस्ट्रेलियाने सर्वप्रथम व्यावसायिक विमानात जैवइंधनाचा वापर करत चाचणी केली होती. यासाठी कौन्सिल ऑफ सायंटीफिक अँड इण्डस्ट्रियल रिसर्च आणि देहरादूनमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रॉलियमने ४०० किलो बायो जेट इंधन तयार केले होते.
देहरादून : भारताने जैवइंधनाच्या सहाय्याने केले विमानाचे यशस्वी उड्डाण.

















