न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. जुलै. २०२०) :- प्रणव याने साडीच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याच्या वडीलांनी त्यास त्वरीत जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
ही घटना रविवारी (दि. १९) रात्री रुपीनगर येथे घडली. प्रणय किशोर भोई (वय २०, रा. रुपीनगर, तळवडे) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास प्रणव याची बहीण देव्हाऱ्यातील निरांजनला मच्छर पळविण्याची अगरबत्ती पेटवत होती. यामुळे प्रणव याने बहिणीशी वाद घातला. त्यावरून ही घटना घडली.















