न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जुलै. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण संवर्धन समितीचे संस्थापक विकास पाटील यांचे (वय ६३) कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनाचे उपचार सुरू असताना सोमवारी रात्री हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.
चिखली परिसरात वास्तव्यास असलेले विकास पाटील गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात काम करत होते. प्लास्टिकमुक्ती, पर्यावरण, पवना नदी सुधार, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना याकरिता त्यांनी मोलाचे कार्य केलेले आहे. त्यांच्या संस्थेमार्फत शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत लॅपटॉप वाटप देखील केले होते.