न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जुलै. २०२०) :- आंदर मावळातील वहाणगाव येथील एका फार्महाऊसच्या मॅनेजरवर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. यामध्ये एकजन जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. मिलींद मन्यारक अशी जखमी झालेल्याचे नाव आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले व त्यांनी जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी तोंडाला मास्क बांधून मोटारसायकलवर आलेल्या दोन व्यक्तींनी फार्महाऊसच्या मॅनेजरवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात तो जखमी झाला. या गोळीबारामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.


















