न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जुलै. २०२०) :- करोना संकटाच्या काळात देशभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. बुधवारी (दि. २२) भारतीय सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे.
चांदीचे दर ६१ हजार रुपये प्रति किलोग्राम झाले, तर सोन्याच्या दरांनीही प्रति १० ग्रामसाठी ५० हजार रुपयांचा आकडा ओलांडला. बुधवारी भारतीय बाजारात एक किलोग्राम चांदीचे दर ६१,२०० रुपये झाले. गेल्या सात-आठ वर्षांमधील चांदीचे हे सर्वाधिक दर असल्याचं सांगितलं जात आहे.















