न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जुलै. २०२०) :- रुपेश भाऊ, असे का म्हणाला नाही म्हणून त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला शिवीगाळ व दमदाटी केली. लाथाबुक्क्यांनी, लाकडी बांबू व विटांनी मारहाण केली. फियार्दी मोहिते व त्यांचा मित्र अभिषेक अवघडे हे दोघे भाजी घेऊन घरी येत होते. किवळे येथे मोकळ्या जागेत ते लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यावेळी हा प्रकार घडला. जखमी झाल्याने दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले.
किवळे येथे शनिवारी (दि. २८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. रुपेश तावरे, योगेश मानकेश्वर व त्यांचे सहा साथीदार (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर रुषिकेश किसन मोहिते (वय २१, रा. एमबी कॅम्प, पाण्याच्या टाकीजवळ, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक कोकाटे तपास करीत आहेत.


















