न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. २२ जुलै) रोजी ८८६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. आज पिंपरी चिंचवड हद्दीतील १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात काळेवाडी (स्त्री ६० वर्षे), नेहरुनगर (स्त्री ७५ वर्षे, पुरुष ६० वर्षे), आकुर्डी (पुरुष ६३ वर्षे), थेरगांव (पुरुष ५६ वर्षे), वाल्हेकरवाडी (स्त्री ५० वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष ७५ वर्षे), पुनावळे (पुरुष ३८ वर्षे), मोरवाडी (पुरुष ६७ वर्षे), रहाटणी (पुरुष ५८ वर्षे, पुरुष ४३ वर्षे), आकुर्डी (पुरुष ६२ वर्षे), जुन्नर (स्त्री ८० वर्षे), चाकण (पुरुष ४९ वर्षे), स्वारगेट (स्त्री ५६ वर्षे) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १३१०७ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ३३७९ रुग्ण उपचार घेत आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण २३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८०१४ वर पोहोचली आहे. आज पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.















