- महामारीमुळे जगच चिंतेत असताना स्वतःच्या वाढदिवसाला दिला फाटा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जुलै. २०२०) :- निगर्वी, सदैव हसतमुख असणारे समाजाच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होणारे उद्योजक गिरीशभाऊ मुथियान यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने कोणतेही कार्यक्रम आयोजन न करता उत्साहात साजरा करण्यात आला. खरंतर कोरोना महामारीमुळे जगच चिंतेत असताना आपला वाढदिवस साजरा करू नये, हीच भावना गिरीशभाऊंची आहे.
सुमारे ३०-३२ वर्षांपूर्वी आळकुटि येथून व्यापारनिम्मिताने मुथियान परिवार भोसरीत स्थायिक झाला. छोट्याशा कापड व्यवसायापासून सुरवात करून ॲटोमेटन ए आय इन्फोसीस्टम प्रा. लि., सेंटीलीजंट अँकेडमी या सॉफ्टवेअर कंपनीची मुहूर्तमेढ रोवली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता सामर्थ्याचा उपयोग केला. तर अनेक बेरोजगार लोकांना व्यव्साय नोकरीची सुवर्णसंधी मिळू शकते या भावनेतून गेल्या तीन वर्षाच्या प्रयत्नातुन युवा उद्योजक भूषण मुथियान व टीम ने अंतरराष्ट्रीय दर्जाचा उत्तम अभ्यासक्रम तयार केलाय.
भोसरी परिसरातील अनेक परिवारांना आपला चौकस व गोड़ स्वभावातुन समाजातुन लग्न बंधनात जोडन्याचे काम गिरीशभाऊंनी केले आहे. त्यामुळे अनेक परिवारचे स्नेही होण्याचे मान त्यांना मिळाले आहे. उपप्रवर्तिनि मंजूलज्योतिजि महाराज यांचा चातुर्मास यशस्वीपणे संपन्न झाला आहे. कार्यकर्त्याच्या भूमिकेतून गिरीशभाऊ सदैव तत्पर राहिले आहे. श्री संघाच्या प्रत्येक कार्यात सहभागी होऊन प्रयत्न यशस्वी करणारा कार्यकर्ता ही त्यांची ओळख आहे. आरोग्य संपन्न दीर्घायुष्य गिरीशभाऊंना मिळो अशी सदिच्छा आहे.
आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, जैन कॉन्फरन्सचे अध्यक्ष पारसजी मोदी, युवा अध्यक्ष सागर सांखला, उपाध्यक्ष प्रा. अशोक पगारिया, जैन श्रवक संघांचे अध्यक्ष सुभाष मामा चूत्तर, माजी अध्यक्ष जवाहरलाल भळगट, राजेंद्र चोरडिया, मदन कर्नावट, डॉ. प्रदीप गांधी, विजय काका कर्नावट, राजेंद्र बाठीया, सुभाषजी डुंगरवाल, मनोज गांधी, मनोज गुन्देचा, नगर येथील एच. यु. गुगळे कंपनीचे उद्योजक संजयजी गुगळे आदींनी फोनद्वारे त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे.


















